संस्थेचा इतिहास

श्री संत गाडगेबाबा अपंगोद्धर शिक्षण प्रसारक मंडळ,देगलूर जि.नांदेड ही संस्था 1990 मध्ये स्थापन झाली.

संस्थेची ध्येय व उद्दिष्टे

    १. शिक्षणप्रसार: सर्व प्रकारच्या विद्येचा प्रसार करणे मुला मुलींना प्रौढांना व महिलांना शारीरिक सांस्कृतिक शिक्षण देऊन त्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न करणे ग्रामीण आदिवासी व मागासवर्गीय लोकांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे व योग प्रबोधन शिबिर घेणे संस्था तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्नशील असते.

    २. शैक्षणिक सोयी: महाराष्ट्र समाज कल्याण सल्लागार बोर्डाचे कार्यक्रम राबवतील. सर्व प्रकारच्या समाजातील मुला मुलीच्या उन्नतीसाठी प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व उच्च माध्यमिक शाळा अशा सर्व प्रकारच्या इतर शैक्षणिक संस्था स्थापन करणे चालवणे व चालवण्यात घेणे यासाठी प्रयत्नशील असते

    ३. कला व शिक्षणाला प्रोत्साहन: हुशार व गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व निधी नुसार शिष्यवृत्ती बक्षीस कर्ज किंवा आर्थिक सहाय्य करणे किंवा शैक्षणिक साहित्य वाटप करून मदत करणे. अपंग अंध मूकबधिर मतिमंद निवासी विद्यालय सुरू करून त्यांचे योग्य ते पुनर्वसन करणे वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू करणे तसेच महिला व बालकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी येता योग्य संस्था सुरू करणे शेती व कृषी विकास ग्रामविकास पाणलोट क्षेत्र विकास आरोग्य विकास आणि दारू व व्यसनमुक्ती मोहीम योजना राबविणे वय वर्ष 18 नंतर पुढील शिक्षणासाठी किंवा कार्यशाळेत जाण्यासाठी शाळेतील प्रवेशित विद्यार्थ्यांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन करणे.

    ४. आर्थिक व शैक्षणिक सहाय्य: हुशार व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, बक्षिसे, कर्ज, आर्थिक सहाय्य, पुस्तके व वह्यांची मदत करणे.

संस्थे अंतर्गत उपक्रम

निवासी मूकबधिर विद्यालय कळमनुरी जिल्हा हिंगोली
निवासी मतिमंद विद्यालय कळमनुरी जिल्हा हिंगोली
सम्राट अशोक निवासी मतिमंद विद्यालय तामसा तामसा रोड हदगाव, जिल्हा नांदेड
श्री संत गाडगेबाबा अपंगोद्धर शिक्षण प्रसारक मंडळ,देगलूर जि.नांदेड | Designed by Oddthemes | Distributed by Gooyaabi